Background Lotus
Amrutvahini Lotus
अभंग

जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ

अभंग

जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥१॥ करील ते काय नोहे महाराज । परी पाहे बीज शुद्ध अंगी ॥२॥ जयाने घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवाची ॥३॥ तुका म्हणे तेथे सुखा काय उणे । राहें समाधाने चित्ताचिया ॥४॥
Amrutvahini - Spiritual Companion