Background Lotus
Amrutvahini Lotus
अभंग

रूप पाहतां लोचनीं

अभंग

रूप पाहतां लोचनीं । सुख झालें हो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
Amrutvahini - Spiritual Companion