अभंग
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Share
Related Videos
अभंग
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥१॥ तुळसी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजित ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४ ॥
Related Videos
No videos available
Amrutvahini - Spiritual Companion