Background Lotus
Amrutvahini Lotus
अभंग

तुज पाहातां सामोरी

अभंग

तुज पाहातां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥४॥
Amrutvahini - Spiritual Companion