Background Lotus
Amrutvahini Lotus
अभंग

वारी याने कुंडल हाले

अभंग

वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ॥१॥ राधेला पाहून भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी ॥२॥ हरिला पाहून भुलली चित्ता । मंदिरी घूसळी डेरा रिता ॥३॥ फणस जंबीर कर्दळी दाट । हाती घेऊनी शारंगपाट ॥४॥ मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥५॥
Amrutvahini - Spiritual Companion