श्रीज्ञानेश्वरमहाराजांची आरती
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥धृ०॥ आरती०॥
लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नांव ठेविले ज्ञानी ॥१॥ आरती०॥
प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केलें ।
रामाजनार्दनी । पायीं टकचि ठेलें ॥२॥ आरती०॥